आपल्या मनातल्या भावनांना शब्दांचे कोंदण देणारे लेखन साकारून उत्तम पुस्तके साकारण्यावर आमचा भर असतो. संपादनापासून पुस्तकाचे प्रकाशन करण्यापर्यंत सेवा आम्ही पुरवतो. त्यासाठी मानसगंध प्रकाशन आणि ओशन वेव्हज या प्रकाशनसंस्था कार्यरत आहेत.
नवोदित लेखकांना पाठबळ
स्वतःच्या पुस्तकनिर्मितीचे स्वप्न इथे साकार होते. नवोदित लेखकांना पुस्तक साकारण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले जाते
कॉफीटेबल बुक्स
विविध मौलिक कामे, व्यक्ती, संस्था यांचा थोडक्यात पण सटीक परिचय करून देणारी कॉफीटेबल बुक्स साकारणारे विश्वासार्ह नाव म्हणजे शब्दसारथी.
फोटो बायोग्राफी
छायाचित्रांच्या माध्यमातून मोजक्या शब्दांत जीवनाचा प्रवास सांगणारी चरित्र निर्मिती करतो.
चरित्र/आत्मचरित्र
आयुष्याचा प्रवास उत्तम, चपलख शब्दांत मांडण्यासाठी आपल्या मनातले विचार शब्दांतून उतरवण्यासाठी आम्ही सारथ्य करतो.
शब्दांकन/मुलाखती
विविध व्यक्तींचे विचार शब्दरूपी मांडणी करणे, मुलाखतीतून व्यक्ती जाणून घेणे.
आशय निर्मिती
शब्दांशी निगडीत सर्व सेवा एकाच छताखाली मिळणारे स्थान म्हणजे शब्दसारथी. अनुवादापासून मासिकापर्यंतची सर्व प्रकारची सर्व कामे करताना संपादकीय गुणवत्ता राखून काम केले जाते.
भाषांतरअनुवाद
कथा, कादंबरीपासून ते कोणत्याही प्रकारचे तांत्रिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, कृषी, साहित्यिक अनुवाद करणारी सक्षम टीम आहे.
वृत्त लेखन सेवा
कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्तम मांडणीसह बातमी लेखन करून दिले जाते. वृत्तपत्रानाही या सेवेचा लाभ घेता येतो.
विशेषांक निर्मिती
उत्तम मांडणीसह, आपल्या मनातला विषय साकारण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि उत्तम विषय साकारले जातात.
दिवाळी अंकांचे संपादन
दिवाळी अंकाच्या संपादनांचा अनेक वर्षांचा अनुभव. दर्जेदार मजकूर, उत्तम मांडणी, प्रुफ रिडींगसह दिवाळी अंक संपादनाची यशस्वी परंपरा