अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ

आमच्याविषयी

शब्द माणसाला मिळालेले वरदान. जनना पासून शेवटपर्यंत साथ देतात ते शब्द. भावनाच्या अभिव्यक्तीचा एक बळकट आधार म्हणजे शब्द! दोन व्यक्तिंमध्ये संवादाचा सेतू बांधणारे ते शब्द. त्यामुळेच ‘शब्दांवाचून कळले सारे’ ही आदर्श स्थिती क्वचितच.. बहुतांश वेळा ‘शब्दांवाचून अडले सारे..’ अशीच अवस्था अधिक वेळा. या अवस्थेला तारून न्यायला लागतो एक सारथी. जो आपल्या आतल्या, मनातल्या, भावविश्वातल्या गोष्टींमध्ये आपल्यासोबत रमेल.. आणि देईल त्यांना शब्दरूप.. उतरवेल आपल्या मनाची भाषा कागदावर.. ‘शब्दसारथी’ चा जन्म यासाठीच! ‘शब्दसारथी’ - आम्ही शब्दांच्या दुनियेत विहार करतो. शब्दांच्या अवकाशातील संवादाच प्रवास अर्थपूर्ण, परिपूर्ण व्हावा यासाठी.


आमचा दृष्टीकोन
शब्दांशी निगडीत सर्व सेवा एकाच छताखाली प्रदान करण्यासाठी कटिबद्ध. आपल्या आवश्यकतेनुसार प्रत्येक प्रकारच्या दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आशयाची निर्मिती करणारे ठिकाण म्हणजे शब्दसारथी


लक्ष्य
भाषेवर प्रेम कऱणाऱ्या, विविध भाषांमध्ये आशयनिर्मिती करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला जोडून घेणे. भाषा प्रेमींची सांगड घालून उत्कृष्ट आशयनिर्मितीचा आनंददायी अनुभव घेणे आणि देणे.

Quick Links

Address

शब्दसारथी

"स्वप्नपराग". बाळकृष्ण सोसायटी,

प्लॉट नं. ३८. अक्षयनगर,

धनकवडी, पुणे ४३.

Email : shabdsarathi@gmail.com

Phone 1 : 9850081402

Phone 2 : 9921095708

अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ
© 2020 - 2024 शब्दसारथी