अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ

शब्दसारथी

‘शब्दसारथी’ ही अभिव्यक्तीला स्वतंत्र व्यासपीठ देणारी आशयनिर्मिती संस्था आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण साहित्य आणि आशय निर्मिती करण्यावर भर दिला जातो. शब्दसारथीने आत्तापर्यंत विविध प्रकारच्या पुस्तकांची, कॉफीटेबल बुकची निर्मिती केली आहे. या शिवाय, भाषेशी संबंधित विविध उपक्रम राबवण्यावर भर दिला जातो. शब्दांशी संबंधीत सर्व प्रकारच्या सेवा एका छताखाली उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून शब्दसारथीचा नावलौकिक आहे. संपादन, शब्दांकन, मुलाखती, विशेषांक निर्मिती, भाषांतर, अनुवाद, संहिता लेखन, सोशल मिडिया व्यवस्थापन, संकेत स्थळ निर्मिती, वृत्त लेखन, प्रकाशन, कॉफीटेबल बुकची निर्मिती, कॉपी रायटिंग अशा अनेकानेक विषयांमध्ये काम सुरु आहे. उत्तम कंटेंट रायटर्स आणि भाषांतरकार यांची मोठी टीम आपल्याकडे आहे.

आपल्या मनातल्या भावनांना शब्दांचे कोंदण देणारे लेखन साकारून उत्तम पुस्तके साकारण्यावर आमचा भर असतो. संपादनापासून पुस्तकाचे प्रकाशन करण्यापर्यंत सेवा आम्ही पुरवतो. त्यासाठी मानसगंध प्रकाशन आणि ओशन वेव्हज या प्रकाशनसंस्था कार्यरत आहेत.
 

नव्या काळासोबत राहून आजच्या युगातील सर्व डिजीटल सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. सोशल मीडिया व्यवस्थापन, संकेतस्थळ निर्मिती, लघुपट/माहितीपट, व्हिडिओ बायोग्राफी, इंडस्ट्रीयल डॉक्युमेंट्री, व्हिडिओ न्यूज क्रिएशन अश्या सेवा उपलब्ध आहेत.
 

अक्षरे ते इमोजी भाषेचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असताना भाषेचे जतन, संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यामध्ये विविध कार्यशाळा, कार्यक्रम संयोजन, बालकेंद्रीत उपक्रम, शब्दसहल, वाचनकट्टा, विविध मनोरंजनपर कार्यक्रम इत्यादी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते

आमचा दृष्टीकोन आणि लक्ष्य

शब्दांशी निगडीत सर्व सेवा एकाच छताखाली प्रदान करण्यासाठी कटिबद्ध. आपल्या आवश्यकतेनुसार प्रत्येक प्रकारच्या दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आशयाची निर्मिती करणारे ठिकाण म्हणजे शब्दसारथी. भाषेवर प्रेम कऱणाऱ्या, विविध भाषांमध्ये आशयनिर्मिती करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला जोडून घेणे. भाषा प्रेमींची सांगड घालून उत्कृष्ट आशयनिर्मितीचा आनंददायी अनुभव घेणे आणि देणे.

Quick Links

Address

शब्दसारथी

"स्वप्नपराग". बाळकृष्ण सोसायटी,

प्लॉट नं. ३८. अक्षयनगर,

धनकवडी, पुणे ४३.

Email : shabdsarathi@gmail.com

Phone 1 : 9850081402

Phone 2 : 9921095708

अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ
© 2020 - 2024 शब्दसारथी